ओतूर – ग्रामविकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालय, ओतूरचा स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट धोलवड, पुणे यांचे वतीने “उपक्रमशील शाळा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक दिनकर दराडे यांनी दिली. स्व. रामचंदजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्ट धोलवड, पुणे यांचे वतीने शैक्षणिक, सामाजिक, दुर्गसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा शाळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. चैतन्य विद्यालय सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी ते पोषक ठरत असते. हा पुरस्कार ग्राम विकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, सचिव प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप, मुख्याध्यापक दिनकर दराडे, उपमुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पानसरे, शिक्षक प्रतिनिधी मिलिंद खेत्री यांनी स्वीकारला. या प्रसंगी जे. सी. कटारिया, रतिलाल बाबेल, जयप्रकाश बाबेल, वल्लभ शेळके, विक्रम भोर, सरपंच कांदळी उपस्थित होते. शाळेला पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, रोहिदास घुले, प्रशांत डुंबरे, वसंत पानसरे, शिवाजी अस्वार यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)