चैतन्य विद्यालयात आकाश कंदील बनविणे कार्यशाळा

ओतूर- येथील ग्रामविकास मंडळ, ओतूर संचलित चैतन्य विद्यालयात 5 वी ते 10 वीमधील विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनविणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यालयातील 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली. विद्यार्थ्यांमधील कलेला वाव देणे, त्यांच्यातील सृजनशीलता विकसित व्हावी, सकारात्मक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने या कार्यशाळेच आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरणार नाही, अशी शपथ घेतली. कार्यशाळेत विद्यालयातील कला शिक्षक संतोष सोनवणे, रोहिणी घाटकर, सत्यवान खंडाळे यांनी प्रात्यक्षिक करून विविध आकाराचे आकाश कंदील कसे तयार करायचे, याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी काग, मणी, काड्या आणि दोरा यांचा वापर करून सुंदर आकाश कंदील तयार केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शरद माळवे, संतोष कांबळे, राजाराम शिंदे, लक्षण दुडे, विशाल चौधरी, गोपाळ डुंबरे, मिलिंद खेत्री, शिल्पा भालेराव, सोनाली कांबळे, सोनाली माळवे, ज्ञानेश्वर वळे, अमित झरेकर, शुभांगी मुरादे यांनी काम केले. कार्यशाळेस मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे, संजय ढमढेरे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, बबन डुंबरे यांनी भेट दिली व सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)