चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये तालुका कबड्डी स्पर्धा पार

इंदोरी – जिल्हा क्रीडा परिषद पुणे व चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (इंदोरी) यांच्या वतीने तालुका कबड्डी स्पर्धा 10, 11 व 12 सप्टेंबरला झाल्या. तोलानी मारीटाईम इन्स्टिट्यूटचे क्रीडा समन्वयक पियुष भटनागर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. लक्ष्मण सिंग, राहुल सिंग चौहान प्रमुख पाहुणे होते. रामभाऊ परुळेकरचे इस्कांडे, कृष्णराव भेगडे स्कूलचे गोरख काकडे, जांभूळकर, न्यू इंग्लिश स्कूल टाकवे यावेळी मंचवर उपस्थित होते. 14, 17 व 19 वर्षांखालील गटांत 61 शाळांतील 732 विद्यार्थीनींनी भाग घेतला.

राहुल सिंग चौहाण, चेअरमन भगवान शेवकर, सेक्रेटरी राधिका शेवकर, त्यागराज शेवकर, मुख्याध्यापिका हेमलता खेडकर समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक सुनील खंडाळे यांनी नियोजन केले. सरस्वती विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक प्रवीण ढवळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)