‘चेहऱ्याद्वारे’ सुरक्षितता (भाग-१ )

आधार कार्डाच्या प्रमाणीकरणासाठी चेहऱ्याचाही वापर येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार असल्याचे युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटीने (युआयडीए) जाहीर केले आहे. डोळ्यांची बुब्बुळे आणि बोटांच्या ठशांव्यतिरीक्त आता चेहऱ्याचाही वापर यासाठी करण्याला या प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. यानिमित्ताने चेहऱ्यावरून ओळख पटवण्याचे म्हणजे फेशियल रेकग्नीशन तंत्र काय आहे हे या लेखात आपण समजून घेऊ…

चेहऱ्यावरून ओळख किंवा प्रमाणीकरण हे बायोमेट्रीक सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन आहे. यावरून व्यक्तीच्या चेहऱ्यावरील रेषांच्या आधारे तुलना आणि विश्‍लेषण करून व्यक्तीची ओळख किंवा प्रमाणीकरण करता येते. चेहऱ्यावरून प्रमाणीकरण हे बहुंताश वेळा सुरक्षेच्या कारणासाठी केले जाते. अर्थात अलिकडच्या काळात इतर कारणांसाठीही हे तंत्रज्ञान वारपरले जाते. खरे तर हे तंत्रज्ञान इतके विलक्षण आहे की अन्य कारणांसाठीही त्याचा उपयोग करता येतो आणि तो प्रभावी ठरतो याची जाणीव आता झाली आहे. या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणे म्हणूनच आवश्‍यक आहे.

-Ads-

चेहऱ्यावरून ओळख किंवा फेशियल रेकग्नीशन याला फेस रेकग्नीशन असेही म्हणतात. याची वेगवेगळी तंत्रे आहेत. उदाहरणार्थ जनरलाईज्ड मॅचिंग फेस डिटेक्‍शन मेथड आणि अॅडॅप्टीव्ह रीजनल ब्लेंड मॅचिंग मेथड. इतर बायोमेट्रीक पद्धतींपेक्षा चेहऱ्यावरून प्रमाणीकरण किंवा ओळख ही बायोमेट्रीक पद्धत अधिक परिणामकारक आणि फायदेशीर आहे. एक तर चेहऱ्यावरून प्रमाणीकरण हे अस्पर्श स्वरूपाचे तंत्रज्ञान आहे. चेहऱ्याच्या प्रतिमा काही अंतरावरून घेतल्या जाऊ शकतात आणि त्यांचे विश्‍लेषण करताना संबंधित व्यक्ती समोर असायलाच हवी अशी गरजही नसते.

परिणामी, युजरशिवाय अन्य कुणीही व्यक्ती याची नक्‍कल करू शकत नाही, म्हणूनच फेशियल रेकग्नीशन हे अत्यंत सुरक्षित तंत्रज्ञान समजले जाते. कारण यात संबंधित व्यक्तीचा चेहरा प्रमाणासाठी आवश्‍यक असतो आणि ती व्यक्ती हजर असल्याशिवाय हे शक्‍य नसते. त्यामुळे अन्य कुणालाही हे तंत्रज्ञान भेदता येत नाही. शिवाय हे तंत्रज्ञान स्वस्तही आहे, कारण यात इतर बायोमेट्रीक तंत्रांपेक्षा खूप कमी प्रक्रिया करावी लागते. अर्थात या तंत्रात काही दोषही आहेत. एक तर भरपूर प्रकाश असेल तेथेच हे तंत्रज्ञान काम करू शकते. त्याचबरोबर चेहऱ्यावरील भाव बदलले तरी हे तंत्रज्ञान कुचकामी ठरते.

या तंत्रज्ञानाला फेशियल रेकग्नीशन टेक्‍नॉलॉजी किंवा एफआरटी असेही म्हणतात. खरे पाहता सर्वात वादग्रस्त असे हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. 1960च्या दशकात ते विकसित करण्यात आले. पण आता त्याचा उपयोग कमालीचा वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि खासगी ग्राहकही त्याचा वापर करतात. यामुळे आपले खासगी आयुष्य धोक्‍यात येऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या लोकांसाठी हे अतिशय महत्वाचे साधन आहे.

कारण यामुळे पास कोड्‌स, फिंगरप्रिंट डेटा आणि किल्ल्यांचीही गरज भासत नाही. पण यामुळे व्यक्तीचे खासगी आयुष्य धोक्‍यात येऊ शकते. मात्र गतवर्षी अॅपल कंपनीने आणलेल्या नव्या आयफोनमध्ये पासवर्ड म्हणून फेशियल रेकग्निशन तंत्राचा वापर केला आहे. या तंत्रामुळे वापरकर्त्याचा चेहरा आयफोनने बघितल्याशिवाय तो कार्यरत होत नाही. या नवीन तंत्रज्ञानाला त्या व्यक्तीचे छायाचित्र दाखवूनही फसवता येत नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)