चेहऱ्याचा तेलकटपणा या नैसर्गिक उपायांनी करा कमी

अनेकांना तेलकट त्वचेला सामोरे जावे लागत आहे. या त्वचेला अनेक समस्या निर्माण होतात. तसेच तुमचे सौंदर्य फिके पडू लागते. चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी येथे दिलेल्या काही नैसर्गिक उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊन त्वचा मुलायमही होईल.

आहार – प्रक्रिया केलेल्या तसेच जंक फूडपासून लांब राहा. बदाम, तेलबिया यासारख्या चांगल्या स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करा. चिज आणि तेलकट पदार्थ चवीला चांगले लागतात. मात्र, यामुळे त्वचेला धोका पोहोचतो. तसेच शरीरात आतून उष्णता निर्माण होते. जंक फूडऐवजी फायबर व पाणी मुबलक असलेली फळे आणि भाजीपाला खावा.

-Ads-

क्‍ले मास्क – चेहऱ्यावर मातीचा लेप (क्‍ले मास्क) लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेतील तेलग्रंथीच्या निर्मितीवर नियंत्रण राहते. मुलतानी मातीत काही थेंब गुलाब पाणी आणि लिंबाचा रस मिक्‍स करुन आठवड्यातून दोन-तीन वेळा चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होईल.

चेहरा स्वच्छ धुवा – तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी फेस वॉशने चेहरा नियमित धुणे गरजेचे आहे. मात्र, कोठे थांबायचे हे देखील माहिती असायला हवे. अधिक प्रमाणात फेस वॉश वापरल्यास त्वचेला इजा पोहोचू शकते. तेलकटपणाचा प्रतिकार करणाऱ्या सौम्य क्‍लिंझरने दिवसातून दोन-तीन वेळा चेहरा धुवावा. यानंतरही तेलकटपणा कायम राहिल्यास फक्त थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा आणि कोरड्या टॉवेलने पुसून घ्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)