IPL 2018 :चेन्नई सुपर किंग्जची राजस्थान रॉयल्सवर सहज मात…

पुणे : शेन वॉटसनच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 64 धावांनी सहज विजय मिळविला. वॉटसनने 57 चेंडूमध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने दमदार खेळी करीत 106 धावा बनविल्या.

शेन वॅटसन आणि सुरेश रैनाच्या फटकेबाजी मुळे चेन्नईने निर्धारीत 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा करत राजस्थान समोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान ठेवले होते.

 

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा डाव 140 धावांवर आटोपला. अशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सवर 64 धावांनी सहज विजय मिळवीत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)