चेन्नईस्थित ज्वेलरी कंपनीच्या 143 कोटींच्या ठेवी जप्त

चेन्नई – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज येथील कनिष्क गोल्ड प्रा.लि. या ज्वेलरी कंपनीच्या 143 कोटी रूपयांच्या ठेवी (एफडी) जप्त केल्या. बॅंक कर्ज मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत संबंधित कंपनीची 191 कोटी रूपयांच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे.

कनिष्क गोल्ड कंपनीने भारतीय स्टेट बॅंकेसह (एसबीआय) एकूण 14 बॅंकांना कर्जाच्या रूपाने तब्बल 824 कोटी रूपयांचा चुना लावला. यासंदर्भात एसबीआयने प्रथम सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने मागील महिन्यात दाखल केलेल्या गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने कारवाईची पाऊले उचलली. दोन दिवसांपूूर्वीच ज्वेलरी कंपनीचा प्लॅंट आणि मशिनरी मिळून 48 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)