चेन्नईच्या हॉटेलमध्ये आढळला डच महिलेचा मृतदेह

चेन्नई – चेन्नईतील एका हॉटेलमध्ये एका डच महिलेचा मृतदेह आढळला आहे. या मृत्यूमागे काय गूढ आहे ते अद्याप उकललेले नाही. लिंडा एरिन हायकर असे या महिलेचे नाव असल्याचे तिच्या पासपोर्टवरून समजते आहे. या महिलेने आपण पत्रकार असल्याचे सांगितले होते.

लिंडा सोमवारी भारतात आली होती. आपण गुरूवारी मायदेशी परतणार असल्याचे या महिलेने हॉटेल स्टाफला सांगितले होते. मात्र गुरूवारी ही महिला चेक आऊट करण्यासाठी आलीच नाही. दुपारी 12.30 पर्यंत हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिची वाट पाहिली. त्यानंतर 12.45 च्या सुमारास डुप्लिकेट चावीने तिच्या हॉटेल रूमचे दार उघडले. त्यावेळी खोलीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना लिंडाचा मृतदेह आढळला. यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले आणि तक्रार दिली.

या प्रकरणी मामबलाम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. लिंडाचा मृतदेह राजीव गांधी सरकारी रूग्णालयात शव-विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या महिलेने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)