चेतेश्‍वर पुजारा तिसऱ्या स्थानी

ऋषभ पंत 21 स्थानांनी झेप घेत 17व्या स्थानी

दुबई: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्याचा फायदा चेत्तेश्‍वर पुजाराला झाला असून आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे पहिले स्थान अबाधित राहिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीमध्ये नाबाद शतक झळकावत विक्रमी कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंतने 21 स्थानांची हनुमान उडी घेतली असून तो फलंदाजांच्या मानांकन यादीत तो 17 व्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर यांनी 1973 मध्ये 17 वे मानांकन मिळवले होते ते आजपर्यंत कोणत्याही भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने मिळवलेले मानांकन होते. त्याची ऋषभ पंतने बरोबरी केली. तर क्रिकेटच्या कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनी कसोटी फलंदाजांच्या यादीत 19 व्या स्थानापर्यंत मजल मारू शकला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सिडनी कसोटीमध्ये पहिल्या डावात 193 धावा करत मालिकेत सर्वाधिक 521 धावा जमविल्या होत्या. 193 धावांच्या खेळीच्या जोरावर त्याने एका स्थानाची आगेकूच केली आणि क्रमवारीत तिसरे स्थान गाठले. फलंदाजाच्या क्रमवारीत विराट पहिल्या स्थानी तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी आहे.
गोलंदाजाच्या यादीत भारतीय कुलदीप यादवने सात स्थानांची आगेकूच करत 45 वे स्थान प्राप्त केले आहे तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या संपूर्ण मालिकेत 21 बळी मिळविणारा जसप्रीत बुमराह 16 व्या स्थानी कायम आहे. रवींद्र जाडेजाने एका स्थानाची प्रगती करत पाचवे स्थान प्राप्त केले आहे तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)