चेतेश्वर पुजाराच्या शतकाने डाव सावरला

ऍडलेड: चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या बळावर भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने 9 बाद 250 धवापर्यंत मजल मारली आहे. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर पुजाराने अन्य फलंदाजाच्या साथीने संघाचा डाव सावरत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलनदाजीचा निर्णय घेतली. परंतु, मागील परदेशी दौऱयाप्रमाणे या दौऱ्यातही भारतीय संघाच्या सलामीवीरांना चांगली सलामी देता आली नाही. पृथ्वी शॉ जायबंदी असल्याने या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या लोकेश राहुलला पुन्हा अपयश आले. तो 2 धावा करून स्वस्तात बाद झाला. राहुल परतल्यावर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा फलंदाजीस आला. सराव सामन्यात शतकी खेळी साकारणारा मुरली विजय देखील फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही, त्याने 11 धावांचे योगदान दिले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विराट कोहली भारतीय संघाची सुरुवातीची पडझड थांबवेल असे वाटत होते. परंतु, विराट विरुद्ध विशेष रणनीती आखून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानी उसळत्या चेंडूंनी त्याची परीक्षा पहिली. 16 चेंडूंचा सामना करून 3 धावा करून विराट बाद झाला तेव्हा भारतीय संघ 3बाद 19 अश्‍या नाजूक स्थितीत होता. पुजराने एक बाजू सांभाळून घेत फलंदाजीस आलेल्या उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेसह डाव सावरण्याचा पर्यंत केला. या दोन खेळाडूंमध्ये 22 धावांची भागीदारी झाल्यानंतर अजिंक्‍य रहाणे 13 धावा करून बाद झाला.

रहाणे बाद झाल्यावर भारतीय कसोटी क्रिकेट संघात पुनरागमन करणारा रोहित शर्मा फलंदाजीस आला. त्याने साकारात्म खेळकरण्यावर भर दिला. आपल्या नैसर्गीक खेळ करताना त्याने वेगाने धावा जमावण्यावर भर दिला. त्यामुळे काही काळ ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेची वातावरण निर्माण झाले. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावल्याने भारतीय संघ धोक्‍याच्या बाहेर आला भासत असताना रोहित शर्माला मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाही. फिरकीपटू नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. रोहितने 61 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर रिषभ पंतला साथीत घेऊन पुजाराने धावसंख्या वाढवण्यावर भर दिला. झटपट धावा करण्याच्या मोहामुळे रिषभ 38 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर अश्विन- पुजाराची जोडी जमली. त्यांनी संयमी फलंदाजी करत काही काळ भारताची गळती थांबवली. पण 78 चेंडू खेळल्यावर तो 25 धावा करून चांगल्या चेंडूवर बाद झाला. भारताचे सर्व फलंदाज बाद झाल्यावर शतकाच्या उंबरठ्यावर असललेल्या पुजाराने आक्रमक पवित्रा अवलंबला. त्याने प्रथम षटकार आणि नंतर चौकार खेचत 99 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर त्याने कारकिर्दीतील सोळावे आणि ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवरील पहिले शतक साजरे केले. 123 धावा केल्यावर तो धावबाद झाला. तो बाद झाल्यावर पंचानी पहील्या दिवसाचा खेळ थांबवला.त्यावेळी दिवसाखेर भारताने 9 गड्यांच्या मोबदल्यात 250 धवापर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक – लोकेश राहुल 2 (झेल- फिंच,गो. हेजलवूड), मुरली विजय 11 (1 चौकार, झेल-पेन, गो. स्टार्क), चेतेश्वर पुजारा 123 ( 6चौकार, 1 षटकार, धावबाद), विराट कोहली 3( झेल- ख्वाजा, गो. कमिन्स), अजिंक्‍य रहाणे 13 ( 1षटकार, झेल- हॅंड्‌सकोम्ब, गो. हेजलवूड), रोहित शर्मा 37 (2चौकार, 3 षटकार, झेल- हॅरिस, गो. लायन), रिषभ पंत25( 2 चौकार, 1 षटकार. झेल- पेन, गो. लायन), आर.अश्विन 25(1 चौकार, झेल- हॅंड्‌सकोम्ब, गो. कमिन्स), ईशांत शर्मा 4 ( 1 चौकार, त्रिफळागो. स्टार्क), मो. शमी 6 नाबाद.

भारताचा नवा ‘द वॉल’ पाचहजारी

भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला द वॉल म्हणून ओळखले जाते. परंतु, त्याच्या निवृत्तीनंतर त्यांची जागा पुजाराने घेतले आहे. आजच्या शतकी खेळीमुळे पुजाराने मोठा कीर्तिमान स्थापन केला आहे. तो पाचहजार धावा बनविणारा भारताचा …. फलंदाज बनला आहे. पुजारा आणि द्रविड यांच्या संयमी खेळींमुळे त्यांना द वॉल हे नाव मिळाले आहे परंतु त्यांच्या आकडेवारीत देखील काही साधर्म्य आढळते. द्रविडने 300 0धावा करण्यासाठी 67 डाव खेळले होते तर पुजारानेही 67 डावात 3000 धावा पूर्ण केल्या होत्या. 4000 धावा करण्यासाठी द्रविड आणि पुजारा याने 84 डाव घेतले. 5000 धावा करण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी सारखेच 108 डाव खेळले आहेत. त्यामुळे त्याला भारताचा नवा ‘द वॉल’ म्हणून संबोधले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)