चेतन केदारी ठरला मावळ श्री 2018

कार्ला – पुणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने राजमुद्रा फिटनेस क्‍लब मळवलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धा मावळ श्री 2018 चा खिताब चेतन केदारी या शरीर सौष्ठवपटूने पटकावला आहे. मळवली रेल्वे स्टेशन जवळच्या मैदानात शरीरीसौष्टव स्पर्धेत पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेतून राजमुद्राश्री 2018 व मावळ मर्यादित मावळ श्री 2018 स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राजमुद्रा फिटनेस क्‍लबचा बोरज येथील चेतन केदारी हा मावळश्री 2018 तर फिटनेस फॅक्‍टरीचा राजेश इरले हा राजमुद्राश्री 2018 ठरला.

स्पर्धेचे उदघाटन लोणावळा पोलिस उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, राजमुद्राचे संस्थापक ज्ञानेश्वर पडवळ, नानेमावळ भाजपा अध्यक्ष चेतन मानकर, सचिन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव नगरपालिका उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज गदिया, रामदास हुलावळे, दत्तात्रय केदारी, विनोद हुलावळे, संदिप कडू, गौरव बालघरे, संदिप आंबुरे, प्रमोद वाशिवले, सोमनाथ केदारी, रुपेश पवार, रविंद्र वाघमारे यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.

-Ads-

यास्पर्धेत मावळ श्री स्पर्धेत टायटल विजेता चेतन केदारी, बेस्ट इंप्रुव्हड बॉडी बिल्डर्स विजेता तळेगाव गणेश नाईकनवरे, बेस्ट पोझर आंबेगाव पवनानगर दिलीप राजीवडे हा ठरला. तर राजमुद्रा श्री राजेश इरले, बेस्ट इंप्रुव्हड बॉडी बिल्डर्स राजु भाडळे तर बेस्ट पोझर गणेश शेडगे ठरला. ही स्पर्धा 55 ते 75 वजन गटात घेण्यात आली. एकूण 195 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

राजमुद्रा फिटनेस क्‍लबच्या वतीने मळवली कार्ला परिसरातील क्रिडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धनश्री हुलावळे, मोनिका गाडे, रुपाली पडवळ, अक्षदा पडवळ, किर्ती गरुड, समृद्धी भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचे पंच म्हणून मंगेश परदेशी, इलियाज शेख, योगेश कांबळे, अनुप गोळे, प्रणव मुजूमदार, संजय महाडिक, विजय सोपडिया, मनोज फुलसंगे, भूषण गायकवाड यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुप गोळे,संजय महाडिक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजमुद्रा फिटनेस क्‍लबच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)