चेतक क्‍लब, महेशदादा फाउंडेशनला विजेतेपद

बाळासाहेब चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुस येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

पिरंगुट- सुस (ता. मुळशी) येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात चेतक स्पोर्ट्‌स क्‍लबने तर महिला गटात महेशदादा फाउंडेशन ने विजेतेपद मिळवले.
सुस ग्रामपंचायतीच्या वतीने मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती, शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या वाढदिवसानिमित्त या जिल्हास्तरीय निमंत्रित पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 40 संघ सहभागी झाले होते. दोन्ही गटात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. पुरुष गटाच्या अंतिम फेरीत चेतक स्पोर्ट्‌स क्‍लबने उत्कर्ष क्रीडा संघाचा पराभव करत पुरुष विजेतेपद, तर उत्कर्ष क्रीडा संघास उविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच शिवाजी उदय मंडळ व बाबुराव चांदेरे फाउंडेशनने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविला. पुरुष गटात प्रथमेश टोनपेकरने उकृष्ट चढाई, ओंकार घोडकेने उत्कृष्ट पकडीचे व समीर ढोकळेला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
महिला गटात अंतिम फेरीत महेशदादा फाउंडेशनने जागृती प्रतिष्ठानचा पराभव करीत विजेतेपदर जागृती प्रतिष्ठानला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. राजा शिवछत्रपती संस्थेने तृतीय तर एम. एच. स्पोर्ट्‌स क्‍लबने चतुर्थ क्रमांक मिळविला. ऋतिका होनमानेला उत्कृष्ट चढाईचा किताब देण्यात आला. नग्रीदा कुराला उत्कृष्ट पकडीचा व तृप्ती लांडगेला अष्टपैलू म्हणून खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, माजी सभापती व सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपसंघटक राम गायकवाड, मुळशी तालुका शिवसेना प्रमुख संतोष मोहोळ, पंचायत समिती सदस्य विजय केदारी, समनव्यक दीपक करंजावणे, वेल्हे तालुका प्रमुख शैलेश वालगुडे, सरपंच अपूर्वा निकाळजे, उपसरपंच गजानन चांदेरे, नितीन चांदेरे, महिला तालुका संघटिका ज्योती चांदेरे, माजी उपसरपंच सचिन चांदेरे, शुभांगी ससार, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चांदेरे, गणेश साळुंके, बाळु निकाळजे, ग्रामपंचायत सदस्या दिपाली पारखी, दिशा ससार, सिमा निकाळजे, नारायण चांदेरे, नामदेव चांदेरे, मीरा देवकर, मीना चांदेरे, दत्तोबा चांदेरे, नवनाथ चांदेरे, तंटामुक्‍ती उपाध्यक्ष बाळासाहेब भोते, रोहिदास चांदेरे, सतीश चांदेरे, शाखा प्रमुख वाल्मिक चांदेरे, महिला आघाडी शाखा प्रमुख शांताबाई चांदेरे, सोमनाथ कोळेकर, ग्रामस्थ, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)