चेक बाउन्स झाला तर… (भाग-२)

file photo

तुम्ही कधी कुणाला “सिक्‍युरिटी’ म्हणून डिमान्ड प्रॉमिसरी नोट म्हणजे पेमेन्ट प्रतिज्ञापत्र किंवा धनादेश दिला आहे का? भाड्याच्या रकमेपोटी दिलेला धनादेश जर बाऊन्स झाला तर त्याचे परिणाम काय होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

चेक बाउन्स झाला तर… (भाग-१)

जर चेक जारी करणाऱ्या व्यक्तीने चेक बाऊन्स झाल्याची नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांत चेकमध्ये लिहिलेली रक्कम अदा केली नाही तर एक महिन्याच्या आत चेक प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या विरोधात कलम 142 अंतर्गत तक्रार दाखल केली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने ही बाब समजून घेतली पाहिजे की या कलमांतर्गत जी मुदत घालून दिली आहे, ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या मुदतीचे कोणत्याही परिस्थितीत पालन होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या खटल्यांची नोंद कोठे करावी, हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय आहे. के. भास्करन विरुद्ध व्ही. शंकरन वैध्यन बालन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 1999 मध्ये पाच संभाव्य अधिकार क्षेत्रांचा उल्लेख केला होता, ज्या ठिकाणी चेक बाऊन्स झाल्याचे खटले नोंदविता येऊ शकतात. तरीही चेक बाऊन्स झाल्यासंबंधीची प्रकरणे कोठे नोंदवायची, या वादाचा अंत झाला नाही. अंतिमतः न्यायाधीशांच्या एका खंडपीठाने नुकतेच आदेश काढून या विवादाला पूर्णविराम दिला आहे. दशरथ रूपसिंह राठोड विरुद्ध महाराष्ट्र सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी असा आदेश दिला आहे की, न्यायालयीन चौकशी आणि न्यायालयीन कारवाईसाठी चेक देणाऱ्याची बॅंक ज्या क्षेत्रात आहे, तेच ठिकाण निश्‍चित करण्यात यावे.

-Ads-

डिमान्ड प्रॉमिसरी नोट म्हणजेच प्रतिज्ञापत्राच्या प्रकरणात हे प्रतिज्ञापत्र रक्कम देण्याचा एक लेखी वायदा मानला जातो. मागणी केल्यास संबंधित व्यक्तीला विशिष्ट रक्कम देणे बंधनकारक असते. हे वचन बिनशर्त असते. डिमान्ड प्रॉमिसरी नोटमध्ये काही बाबी अनिवार्य असतात. मुख्य म्हणजे, रक्कम देण्याचा वायदा बिनशर्त असायला हवा.

हा करार लिखित स्वरूपातच असायला हवा आणि वचन देणाऱ्याची स्वाक्षरी त्यावर असायला हवी. प्रॉमिसरी नोटअंतर्गत अदा केली जाणारी रक्कम आणि ज्या व्यक्तीला ती अदा करायची, त्या व्यक्तीचे नाव त्यावर असायला हवे. अन्यथा या कागदाला न्यायालयात पुरावा म्हणून काहीही अर्थ राहणार नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन चेक किंवा प्रॉमिसरी नोट जारी करणे, ती प्राप्त करणे आणि या कागदपत्रांच्या कार्यान्वयनाची संपूर्ण माहिती ते देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीला असणे गरजेचे आहे.

– कमलेश गिरी 

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)