चेक बाउन्स झाला तर… (भाग-१)

file photo

तुम्ही कधी कुणाला “सिक्‍युरिटी’ म्हणून डिमान्ड प्रॉमिसरी नोट म्हणजे पेमेन्ट प्रतिज्ञापत्र किंवा धनादेश दिला आहे का? भाड्याच्या रकमेपोटी दिलेला धनादेश जर बाऊन्स झाला तर त्याचे परिणाम काय होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

चेक आणि डिमान्ड प्रॉमिसरी नोट “निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्ट अॅक्‍ट-1881’मध्ये अंतर्भूत केले गेले आहेत. निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्ट जारी करणे, ते प्राप्त करण्यासंबंधी किंवा त्याच्याशी संबंधित अन्य पक्षांची बांधीलकी नीट समजून घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. या कागदपत्रांच्या विश्‍वसनीयतेला कायद्यात मोठे महत्त्व दिले जात असल्यामुळे हे करणे गरजेचे ठरते. तसेच या कागदपत्रांचा दुरुपयोग केल्यास शिक्षेची तरतूद आहे. उदाहरणार्थ, चेक म्हणजे धनादेश बाऊन्स होणे हा निगोशिएबल इन्स्ट्रूमेन्ट अॅक्‍टच्या कलम 138 अन्वये शिक्षापात्र गुन्हा आहे. कलम 138 अन्वये या गुन्ह्यासाठी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि चेकवर लिहिलेल्या रकमेच्या दुप्पट दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. चेक बाऊन्स झाल्याचा गुन्हा शाबीत करण्यासाठी चेक ज्या व्यक्तीला मिळाला आहे, त्याने चेक देणारी व्यक्ती त्याचे देणे लागते, हे सिद्ध करणे आवश्‍यक असते. उदाहरणार्थ, भेट म्हणून दिलेला धनादेश बाऊन्स झाल्यास तो देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कलम 138 लागू करता येत नाही. कारण चेक देणारी व्यक्ती घेणाऱ्या व्यक्तीला कोणतीही रक्कम देणे लागत नाही.

चेक घेणाऱ्या व्यक्तीला चेक जारी झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत तो “कॅश’ करवून घेणे बंधनकारक असते. चेक बाऊन्स झाला तर त्याची माहिती 30 दिवसांच्या आत कलम 138 अंतर्गत नोटीस काढून चेक देणाऱ्या व्यक्तीला देणेही अनिवार्य असते. जर ठराविक मुदतीत काही कारणांनी कलम 138 अंतर्गत चेक घेणाऱ्याने चेक देणाऱ्याला नोटीस पाठविली नाही तर संबंधित चेक पुन्हा बॅंकेकडे द्यावा लागतो. तो दुसऱ्यांदा बाऊन्स झाला तर कलम 138 मध्ये दिलेल्या तरतुदींचे कसोशीने पालन करावे लागते.

-Ads-

चेक बाउन्स झाला तर… (भाग-२)

या कलमांतर्गत चेक बाऊन्स होणे हा शिक्षापात्र गुन्हा असल्यामुळे या कलमातील तरतुदींचे कसून पालन केले जाणे आवश्‍यक आहे. त्यामुळे चेक बाऊन्स झाल्यापासून 31 व्या दिवशी पाठविलेली नोटीससुद्धा कायदेशीरदृष्ट्या वैध मानली जात नाही.

– कमलेश गिरी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)