चेक बाउंस प्रकरण; राजपाल यादवला ६ महिन्याची शिक्षा

नवी दिल्ली : बॉलीवूडचा अभिनेता राजपाल यादवला आज चेक बाउंसप्रकरणी न्यायालयाने ६ महिन्याची शिक्षा सुनावली. दरम्यान, ही शिक्षेनंतर लगेच त्याला जामीनदेखील मिळाला. आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने यादवला कोणताही दिलासा न देता शिक्षा सुनावली होती. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचा आपण स्वीकार करतो तसेच याच्याविरोधात उच्च न्यायालयात आपण दाद मागणार असल्याचे राजपाल यादव यावेळी म्हणाला.

चेक बाउंसप्रकरणी राजपाल यादवसह त्याची पत्नी राधा राजपाल यादव आणि त्यांच्या कंपनी विरोधात सात प्रकरणावर आज न्यायालयाने निर्णय दिला. यापूर्वीच न्यायालयाने राजपाल यादव यांना ५ कोटींच्या आर्थिक फसवणुकीत दोषी ठरवले होते. त्याच प्रकरणावर आज न्यायालयाने आपला निर्णय दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)