चेक बाउंन्स झाला तर, दीड हजारांचा दंड

राज्य विद्युत नियामक आयोगाचा आदेश : “मोबाइल अॅप’ वापरण्याचे आवाहन

पुणे – वीजबिलाचा भरणा केलेला चेक कोणत्याही कारणामुळे बाउंन्स झाल्यास 350 रुपयांऐवजी आता 1 हजार 500 रुपयांचा दंड संबधित ग्राहकाला भरावा लागणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे. दि. 1 नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

-Ads-

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्‍यातील सुमारे 1 लाख 75 हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशद्वारे दरमहा वीजबिलांचा भरणा करतात. परंतु, यातील सुमारे 3 हजार ते 4 हजार धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाउंन्स होत आहेत. त्यामुळे महावितरणकडून दंडाची रक्‍कम वाढविण्यात आला आहे.

वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु, अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाउंन्स झाला, आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई केली जाते.

ग्राहकांनी “ईसीएस’चा वापर करावा
महावितरणचे घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाइल अॅप किंवा ईसीएसद्वारे सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाइल अॅपच्या माध्यमातून पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सुमारे 9 लाख 52 हजार वीजग्राहक सुमारे 177 कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरणासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली आहे. घरबसल्या दरमहा सुमारे 20 कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ईसीएसधारक करीत आहेत. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)