चेक प्रजासताकमध्ये रसायन कारखान्यात स्फोट; 6 ठार

प्राग्यु, (चेक प्रजासत्ताक)  – रसायनांच्या कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 6 जण मरण पावले. तर अन्य काही जण जखमी झाले आहेत. चेक प्रजासत्ताकच्या क्रलुपी नॅड वितावू या शहरात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फायर ब्रिगेड रवाना करण्यात आले आहे. तसेच स्फोटातील जखमींच्या सोयीसाठी तातडीची मदत आणि अत्यावश्‍यक सुविधा घेऊन विमान रवाना करण्यात आले आहे.

या स्फोटामध्ये 6 जण जखमी झाले असल्याचे आपत्कालिन सेवा विभागाच्या प्रवक्‍त्यांनी सांगित्ले. रसायनांचा हा कारखाना सिंथोस नावाच्या पोलंडच्या कंपनीच्या मालकीचा आहे. सिंथोस या कंपनीच्या वतीने सिंथेटिक रबर आणि पॉलिएस्रीन बनवण्यात येते.

याच कारखान्यामध्ये 2015 साली झालेल्या अशाच एका स्फोटामध्ये दोघेजण जखमी झाले होते. आज झालेल्या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास केला जाईल, असे पोलिस प्रवक्‍त्यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)