चेक न वटल्याने दोघांवर गुन्हा दाखल

मंचर- पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील ट्रक विक्रीच्या व्यवहाराचा 6 लाख रूपयांचा चेक न वटल्याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात दोघा भावांच्या विरोधात शनिवार (दि. 11) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, भारत भाऊराम पोखरकर यांनी ट्रकचा व्यवहार रांजणी येथील भास्कर बाळासाहेब पवार, अमोल बाळासाहेब पवार यांच्याशी केला होता. यावेळी 25 जून 2018 रोजी शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लेखी देवुन ट्रक विक्रीचा व्यवहार केला. त्यावेळी 3 लाख 31 हजार रूपये ऍडव्हान्स स्वरूपात दिले व उर्वरित 6 लाख रूपयांचा युनियन बॅंकेचा चेक दिला. चेक मिळाल्यामुळे ट्रक कागदोपत्री अमोल पवार यांच्या नावावर भारत पोखरकर यांनी करून दिला.
त्यानंतर 6 लाख रूपयांचा चेक बॅकेत वटला नाही. सदरचा चेक वटु नये यासाठी अमोल पवार यांनी बॅकेला सूचना केली होती. त्यानंतर भारत पोखरकर यांनी भास्कर पवार, अमोल पवार यांच्या विरोधात फसवुणकीची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सागर गायकवाड करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)