चेकपेमेंटसाठी स्टेट बॅंक कार्ड आकारणार शुल्क

मुंबई : स्टेट बॅंकेच्या क्रेडिट कार्डाचे बिल दोन हजारापेक्षा कमी असेल, तर हे बिल भरताना चेकचा वापर करू नका. कारण दोन हजारापेक्षा कमी रकमेचा चेक भरल्यास एसबीआय कार्ड कंपनी तुम्हाला 100 रुपये दंड आकारण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता चेकव्दारे पेमेंट करताना त्या चेकवरील रक्‍कम अगोदर बघून मगच तो चेक बॅंकेत भरावा लागणार आहे. एक एप्रिलपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी हा नियम लागू केल्याचा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे 90 टक्के ग्राहक सध्या इलेक्‍ट्रोनिक पद्धतीने बिलाचे पेमेंट करतात. उरलेल्या ग्राहकांनीही याच पद्धतीला प्राधान्य द्यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)