चेंबूरमधील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट

एकाची प्रकृती गंभीर, 21 जण जखमी
मुंबई – मुंबईत चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरले आहे. या स्फोटात 21 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सुमारे 300 कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. हा स्फोट दुपारी तीन वाजता झाला. रिफायनरमधील बॉयलरचा स्फोट होऊन आग भडकली. या स्फोटात आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याचे समजते.

या स्फोटाने काही किलोमीटरचा परिसर हादरल्याने स्फोटाची तीव्रता लक्षात येते. या स्फोटामुळे आग लागली आणि परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या रिफायनरी प्लान्टच्या बाजूला झोपडपट्टीचा परिसर आहे. खबरदारी म्हणून या झोपडपट्टीतल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. माहुलमध्ये भारत पेट्रोलियमचे मोठे रिफायनरी प्लांन्टस आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चेंबूर माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये भडकलेली आग नियंत्रणात आली आहे. या आगीवर 70 टक्‍क्‍यापर्यंत नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. ही आग विझवण्यासाठी फोमचा वापर करण्यात येत होता. बीपीसीएलच्या हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये स्फोट झाल्याची माहिती असून त्या बाजूला आणखी एका प्लांट आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर तेल टाक्‍या आहे.चेंबूर, कुर्ला, वडाळामधील अग्निशमन दलाच्या गाड्या, तसेच जवळपास 30 ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीपासून काही अंतरावरच टाटा थर्मल प्लान्ट आहे. आजूबाजूला दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)