चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा : सराव शिबीरासाठी संभाव्य भारतीय संघाची घोषणा 

नवी दिल्ली – हॉलंड येथील ब्रेडा येथे होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या 21 दिवसीय सराव शिबिरासाठी संभाव्य भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली असून या संघात 48 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हे शिबीर 28 मे रोजी बंगळुरू येथे सुरू होणार आहे. यापूर्वी झालेल्या तीन आठवड्यांच्या राष्ट्रीय शिबिरातील 55 खेळाडूंमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली असून या सराव सत्रात खेळाडूंच्या वैयक्‍तिक कामगिरीत सुधारणा यावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी हरेंद्र सिंग हे प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहेत. यामध्ये सहा गोलरक्षक, 14 बचावपटू, 13 मध्यरक्षक आणि 15 आघाडीवीर खेळाडूंचा सहभाग आहे.

सराव शिबिरासाठी भारतीय संघ – 
गोलरक्षक – पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा, क्रिशन बहादुर पाठक, विकास दहिया, जगदीप दयाल व प्रशांत कुमार चौहान.
बचावफळी – हरमनप्रीत सिंग, रूपिंदर पाल सिंग, गुरिंदर सिंग, वरुण कुमार, कोठाजीत सिंग खदंगबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, बीरेंदर लाक्रा, नीलम संजीप क्‍सेस, दिपसान तिर्की, गुरिंदर सिंग, जरमनप्रीत सिंग, अमित गौडा व आनंद लाक्रा.
मध्यरक्षक – मनप्रीत सिंग, चिंग्लेसाना सिंग कांगुजाम, सुमित, सिमरनजित सिंग, नीलकंठ शर्मा, सरदार सिंग, हार्दिक सिंग, ललित कुमार उपाध्याय, राजकुमार पाल, अमोन मिराश तिर्की, धरमिंदर सिंग, मनप्रीत व विवेक सागर प्रसाद.
आघाडी – एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, रमणदीप सिंग, दिलप्रीत सिंग, सुमित कुमार, मोहम्मद उमर, अभ्रान सुदेव बेलिमग्गा, मोहम्मद राहिल मोहसीन, अरमान कुरेशी, सुखजीत सिंग, गगनदीप सिंग (सीनियर), प्रदीप सिंग व मनिंदरजीत सिंग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)