चॅनल्सवरील जाहिराबाजी मध्ये भाजपा नंबर 1 राजकीय पक्ष 

नवी दिल्ली, दि. 23-चॅनलवरील जाहिराती भाजपा नंबर 1 राजकीय पक्ष असल्याचे दिसून आले आहे. 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या आठवड्यात सर्व टीव्ही चॅनल्सवर मिळून भाजपाच्या जाहिराती 22,099 वेळा प्रसारित करण्यात आल्या. जाहिरात प्रसारणातील टॉप टेन मध्ये भाजपा हा एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होता, आणि विमल पान मसाला जाहिरात प्रथम क्रमांकावर होती. मात्र आता भाजपाने प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे, तर विमल पान मसाला टॉप 10 मध्येही राहू शकला नाही. बार्क (ब्रॉडकास्ट्‌ ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल) दर आठवड्याला चॅनल्सचे रेटिंग आणि जाहिरात प्रसारणाची आकडेवारी जाहीर करत असते.

डिसेंबरअखेर पर्यंत 5 राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. आणि त्यांचा परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकेवर होणार आहे. त्यामुळे जाहिरातींचे प्रमाण वाढले असल्याचे विश्‍लेषकांचे मत आहे. गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने जाहिरातींवर सुमारे 5,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. युपीए सरकारने दहा वर्षात एवढा खर्च केला होता. या वर्षी माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीनुसार मोदी सरकारने 2,221.11 कोटी रुपये इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरील जाहिरातींसाठी खर्च केले आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)