चुलीवर स्वयंपाक बंद; गॅस जोडणीचे वाटप

  • डोर्लेवाडी येथील दारिद्रय रेषेखालील 50 लाभार्थी

डोर्लेवाडी  – केंद्र सरकारने 2016मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वल योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलते आहे. वर्षोनुवर्षे चुलीवर स्वयंपाक करताना धूर फुकुन फुकुन धम्याचे आजार जडले…, आज गॅस मिळाल्याने त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.
बारामती तालुक्‍यातील डोर्लेवाडी येथील दारिद्रय रेषेखालील 50 गरजू लाभार्थ्यांना गॅस जोडणी वाटप करण्यात आले. यासाठी डोर्लेवाडीचे उपसरपंच कांतीलाल काळकुटे, भाजपचे बारामती शहरचे माजी सरचिटणीस अजित जाधव, जावेद शेख, सचिन दळवी, रणजित भोपळे, भाऊसो मागडे आदींनी योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून या 50 लाभार्थ्यांना गॅस जोडणी कनेक्‍शन मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत घरगुती गॅसचा ग्रामीण भागातील डोर्लेवाडी व परिसरातील गोर-गरीब, दुर्बल घटकातील महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आमच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. उर्वरित गरजूंना देखील त्यांच्या कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर लाभ मिळवून दिला जाणार आहे.
लाभार्थी महिलांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे आम्ही चुलीवर स्वयंपाक करीत होतो. धुरामुळे आम्हाला फार त्रास व्हायचा धूर फुकुन फुकुन दम्याचा आजार जडला. घरातील लहान मुलांना धुराचा त्रास व्हायचा. आता मोफत गॅस कनेक्‍शन दिल्याने धुराचा त्रास कमी होईल, यामुळे आम्ही आम्हाला खूप आनंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)