चुलीमध्ये स्फोट ; मुलगी जखमी

पिंपरी – चुलीवर स्वयंपाक करत असताना अचानक स्फोट झाल्याने स्वयंपाक करणारी 14 वर्षीय मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी बारा वाजता घडली.

हसिना अदिवासी (रा. बावधन) असे जखमी मुलीचे नाव आहे. रामरस आदिवासी, रामफूला आदिवासी, विणा आदिवासी, कशाली आदिवासी हे चारजण यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. हसिना ही सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक मोठा स्फोट झाला. या आवाजाने परिसरात भितीचे वातावरण पसरले.

-Ads-

घटनेची माहिती मिळताच पोलीस व बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी चुलीमध्ये डुकरे मारण्यासाठी वापरण्यात येणारा लसण्या बॉम्ब पडल्याने त्याचा स्फोट झाला. मात्र तो बॉम्ब तेथे कसा आला व हद्दीत डुकरांची खुलेआम शिकार केली जाते का असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)