चुरशीच्या लढतीत टाकवेत साधना असवले विजयी

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – आंदर-मावळातील सर्वात मोठी टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा निकाल बुधवार दि. 28 ला जाहीर झाला. महिला खुल्या प्रवर्गासाठी साधना कैलास असवले व आरती अविनाश जाधव यांच्यात चुरशीच्या लढत झाली. 294 मते मिळवून साधना कैलास असवले विजयी झाल्या.

आरती जाधव यांना 255 मते मिळाली. आठ दिवसांपासून दोनही उमेदवाराकडून जोरदार प्रचार करण्यात आला. टाकवे गावच्या सरपंच सुप्रिया मालपोटे, ग्रामपंचायत सदस्या अश्‍विनी असवले यांनी निवनिर्वाचित सदस्या साधना असवले यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. शिवाजी असवले, स्वामी जगताप, दत्ता असवले, अनिल असवले, तानाजी असवले, नवनाथ आबेकर, भूषण जाधव, विलास असवले, कैलास असवले, भरत असवले यावेळी उपस्थित होते.

-Ads-

भंडाऱ्याची उधळण करीत विजयी उमेदवाराची गावातून मिरवणूक काढण्यात आली. नंदुशेठ असवले यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. वार्ड क्रमांक 2 व टाकवेच्या विकासासाठी सदैव बांधील राहील, असे निवनिर्वाचित सदस्या साधना असवले म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)