चुकून दुसऱ्याच्या घरात शिरून घरमालकालाच घातली गोळी

न्यूयॉर्क (अमेरिका): आपले घर समजून चुकून दुसऱ्याच्या घरात शिरलेल्या महिला अधिकाऱ्याने चुकून घरमालकालाच गोळी घातल्याचा अजब प्रकार डलासमध्ये घड्‌ला आहे. आपली ड्यूटी संपवून आलेली महिला अधिकारी चुकून शेजाऱ्याच्या घरात शिरली आणि तिने चोर समजून घरमालकालाच गोळी घातली. ही गोष्ट तिने स्वत:च पोलीसांना सांगितली आहे.

गुरुवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. हे अपार्टमेंट हाऊस पोलीस हेडक्वार्टर्सपासून अगदी जवळच आहे. खास चावी व्बा कीपॅडचा वापर करून घरात प्रवेश करता येतो, असे अपार्टमेंट कॉंप्लेक्‍सच्या इतर रहिवाशांनी सांगितले आहे. हे सगळे कसे घडले हे अधिकाऱ्यालाही समजले नसल्याचे सार्जंट वॉरे मिशेलने सांगितले. मृत व्यक्तीची बोथम ज्यॉं (26) अशी ओळख पटली आहे. त्याला नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. महिला अधिकाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून तिला प्रशासनिक रजेवर पाठवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)