चुकीच्या आणि पुरावे नसलेल्या प्रकरणात आपल्यावर कारवाई

बडतर्फ सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांचा दावा

नवी दिल्ली- सरकारने आपल्यावर खोट्या आणि पुरावे नसलेल्या प्रकरणात केवळ एका व्यक्तीच्या सांगण्यावरून कारवाई केली असल्याचा दावा बडतर्फ सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांनी केला आहे. वर्मा यांना या पदावरून काढून टाकून त्यांना पुन्हा त्यांच्या मुळ अग्निशमन सेवा विभागात पाठवण्यात आले आहे. नागरी संरक्षण आणि होमगार्ड विभागाही त्यांच्याकडे पुर्वी होते तेथेच त्यांना पुन्हा परत पाठवण्यात आले आहे. त्यांची सीबीआय प्रमुख पदासाठीची मुदत 31 जानेवारीला संपत होती. पण त्यांना या पदावरून काढून टाकण्याचा निर्णय काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 2-1 या मतांनी संमत झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलोक वर्मा यांना या पदावरून दूर करण्यात आल्यानंतर आता या पदाचा कार्यभार पुन्हा एम नागेश्‍वरराव यांच्याकडे देण्यात आला आहे.

या प्रकरणात वर्मा यांनी प्रथमच आपले मौन सोडताना पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की सीबीआय ही देशातील एक महत्वाची तपास संस्था असून कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय या संस्थेला कारभार करू देणे अपेक्षित असते. मी या संस्थेची प्रतिष्ठा जपण्याचाच निष्ठेने प्रयत्न केला पण या संस्थेची प्रतिष्ठाच सध्या नष्ट केली जात आहे. आपल्यावर केवळ एका व्यक्तीने आरोप केले आहेत आणि त्या आरोपांना कोणताही पुरावा नसताना आपल्यावर ही चुकीची कारवाई करण्यात आली आहे. वर्मा यांच्या विरोधात सीबीआयचे निलंबीत विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी आरोप केले आहेत.

दरम्यान या संबंधात निर्णयाला विरोध करणारे उच्चस्तरीय समितीचे सदस्य मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले की केंद्रीय दक्षता समितीने वर्मा यांच्यावरील दहा आरोपींची चौकशी केली. त्यातील सहा आरोप खोटे आहेत, चार आरोपांची नव्याने चौकशी करण्याची गरज आहे असा दक्षता आयोगाचा निष्कर्ष आहे. अन्य चार आरोपांच्या बाबतीत त्यांच्या विरोधात परिस्थिती जन्य पुरावा आहे असे त्यात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)