चुकीची बिले देणाऱ्यांवरही कारवाई

महावितरणचा निर्णय; अधिकारी, कर्मचारी रडारवर
नगर – ज्या भागात वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगऐवजी सरासरी किंवा सदोष किंवा जादा रीडिंगचे बिल देण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर महावितरणने आता लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
औरंगाबाद येथील एका भाजीविक्रेत्याला आठ लाख रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले. वीजबिल दुरुस्तीसाठी त्याने वारंवार चकरा मारल्या; पंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. अगोदर वीजबिल भरा, नंतर दुरुस्त करून देतो, अशी नेहमीची भूमिका महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली.

सदोष किंवा जादा आकाराच्या चुकीच्या वीजबिलाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे ताबडतोब निराकरण करण्याचे तसेच वीजग्राहकांना अचूक मीटर रिडींगचे बिल देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत.

दरम्यान वीजग्राहकांना चुकीचे किंवा अवाजवी रिडींगचे सदोष वीजबिल प्राप्त झाल्याबाबत तक्रारी असल्यास धास्तावून न जाता त्यांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधावा असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून खास मीटर रिडींगसाठी तयार केलेल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून मीटर रिडींग सुरु आहे. त्यामुळे बिलिंगच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत कमी झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेत मीटर रिडींगची पद्धती अधिक सोयीस्कर व सोपी झालेली आहे. रिडींगमध्ये अचूकताही आलेली आहे. परंतु मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीजचा हलगर्जीपणा किंवा तांत्रिक चुकांमुळे वीजग्राहकांना सरासरी, जादा युनिटचे सदोष बिल प्राप्त झाल्यास त्याबाबत संबंधित कार्यालयात त्वरीत तक्रार करावी. अशा प्राप्त झालेल्या तक्रारींच्या निवारणासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच यापुढे सदोष मीटर रिडींग चालू राहिल्यास संबंधित मीटर रिडींग एजन्सीजविरुद्ध आर्थिक दंड, काळ्या यादीत टाकणे आदी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अचूक रिडींगद्वारे योग्य वीज वापराचे बिल देण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. परंतु याउलट वीजमीटर सुस्थितीत असतानाही केवळ शून्य किंवा 1 ते 50 युनिटपर्यंतच वीजबिलांची आकारणी होत असल्याचे दिसून येत आहे. हा वीजवापर प्रत्यक्षात आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी महावितरणकडून वीजमीटरची तपासणी सुरु करण्यात आलेली आहे. वीजवापरापेक्षा अत्यंत कमी किंवा खूपच जादा रिडींगचे बिल आल्यास वीजग्राहकांनी हे दोन्ही प्रकार निदर्शनास आणून देण्याचे किंवा त्यासंबंधी तक्रार करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

ज्या ग्राहकांना सरासरी, नादुरुस्त वीजमीटरचे वीजबिल येत आहे त्यांनी वीजबिल दुरुस्तीसाठी त्वरीत नजिकचे संबंधित कार्यालय किंवा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे. तसेच वीजबिलासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीचे ताबडतोब त्वरीत निराकरण करण्याचे निर्देश स्थानिक कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)