चुकार प्रवाशांना रेल्वेकडून दंड

नवी दिल्ली -भारतीय रेल्वेने बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या व्यक्तींना दंड ठोठावत 1,097 कोटी रुपये गोळा केले आहेत. एप्रिल 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत हा दंड जमा करण्यात आला आहे. एकूण रकमेपैकी डिसेंबर अखेरपर्यंत 850 कोटीपेक्षा जास्त दंड गोळा करण्यात आला होता. चालू महिन्यात अतिरिक्त 200 कोटी रुपयांचा दंड गोळा होण्याचा अनुमान आहे. प्रवाशांनी बेकायदेशीर प्रवास करू नये यासाठी रेल्वेकडून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.

रेल्वेकडून तिकीट तपासणी जोरदार राबविण्यात येत आहे, असे रेल्वे बोर्डचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये 18.18 लाख जणांची तिकीट तपासणी करण्यात आली होती असे रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी राज्यसभेत गेल्या महिन्यात सांगितले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. फेबुवारी अखेरपर्यंत 3 कोटी लोकांना विनातिकीट पकडण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)