चीप डिझायनिंगची वेगळी वाट…

सध्याच्या वाढत्या तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन आधुनिक झाले आहे. याच वाढत्या टेक्‍नॉलॉजीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरच्या अनेक चांगल्या संधीही उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानात चीप डिझायनिंग इंडस्ट्रीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणूनच त्यात करिअर करणं हा अर्थातच चांगला ऑप्शन आहे… 

इंजिनीयरिंगमध्ये करिअर करण्याची आवड आहे?, आव्हानात्मक काम पेलण्याची तयारी आहे?… मग तुमच्यासाठी चीप डिझायनिंग हा एक उत्तम पर्याय आहे. चीप सिलिकॉनचा एक छोटा पातळ तुकडा मशीनच्या इंटीग्रेटेड सर्किट बेसचे काम करत असतो. मात्र, चीप डिझायनर त्याच्या मदतीने मोठ्या आकारातील उपकरणांनाही छोट्या आकारात बदलतो. म्हणूनच चीप डिझायनरची मागणी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाढत आहे. चीप डिझायनरचे मुख्य काम म्हणजे छोट्या किंवा मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची कार्यक्षमता वाढवून ती वापरण्यास सुलभ बनवणे. टीव्ही रिमोट, मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, ऑटोमोबाईल सेक्‍टर या सर्व क्षेत्रांमध्ये चीपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. या इंडस्ट्रीमध्ये डिझाइन इंजिनीअर, प्रॉडक्‍ट इंजिनीअर, टेस्ट इंजिनीअर, सिस्टिम्स इंजिनीअर, प्रोसेस इंजिनीअर, पॅकेजिंग इंजिनीअर, सीएडी इंजिनीअर आदी स्वरुपात काम करता येऊ शकते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुम्हाला काय यायला हवं? 
चीप डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेली कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीई किंवा बीटेकची पदवी मिळवलेली असावी. चीप डिझायनिंगमध्ये विशेषत: डिझाइन, प्रॉडक्‍शन, टेस्टींग, ऍप्लिकेशन्स आणि प्रोसेस इंजिनीयरिंगचा समावेश असतो. या क्षेत्रासाठी काही संस्थांमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध आहेत. ज्यांचा संबंध हा आयसी, सर्किट डिझाईन आणि माइक्रो प्रोसेसशी असतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही आवश्‍यक कौशल्ये असणे गरजेचे आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे विशेष ज्ञान असावे. त्याशिवाय उत्तम संवाद कौशल्य, टीम वर्क, समस्या सोडविण्याची क्षमता, तसेच प्रोग्रॅमिंग आणि मॅथॅमॅटीकल कौशल्य यांसारख्या गोष्टींची आवश्‍कता असते. टेक्‍नॉलॉजी डेव्हलपमेंट्‌स आणि आधुनिक इनोव्हेशनचे विशेष ज्ञान असणे आवश्‍यक आहे.

कुठे शिकाल हा कोर्स? 
काही प्रमुख संस्थांमध्ये या क्षेत्राशी निगडित कोर्सेस चालवले जातात. त्यामध्ये बिटमॅपर इंटीग्रेशन टेक्‍नॉलॉजी पुणे, सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटींग, बेंगळूर, जामिया मिलीया इस्लामिया, नवी दिल्ली या त्यातील काही प्रमुख संस्था आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)