बीजिंग: चीन सरकारने ख्रिश्‍चनांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. चीनची राजधानी बीजिंगमधील सर्वात मोठे चर्च “जियोन’ जबरदस्तीने बंद करण्यात आले आहे. परवानगीविना ते चालवण्यात येत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. अनेक प्रांतांमध्ये ख्रिश्‍चनांचा पवित्र ग्रंथ बायबल आणि पवित्र क्रॉस नष्ट करण्यात आले. ख्रिश्‍चन नागरिकांकडून आपला धर्म सोडण्यासाठी दस्तावेजांवर सह्या घेण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. चीनच्या कम्युनिस्ट सरकारने गेल्या काही काळात अल्पसंख्याकांच्या-विशेषत: ख्रिश्‍चनांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे.

विविध धर्माच्या लोकांची नास्तिक कम्युनिस्ट सरकारशी निष्ठा वाढावी आणि भविष्यात पक्षापुढे कोणतीही समस्या उभी राहू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. आगामी काही दशकांत चीनमध्ये जगातील सर्वाधिक ख्रिश्‍चन लोकसंख्या होणार असल्याच्या शक्‍यतेने ख्रिश्‍चन समुदायाचे पद्धतशीर रीतीने दमन करण्याचे प्रयत्न चालले आहेत.
ख्रिश्‍चनांप्रमाणे मुस्लिमांवरही चीन सरकारची वक्रदृष्टी आहे. उत्तर-पश्‍चिम भागातीत सुमारे 10 लाख मुस्लिमांना अनियंत्रित पद्धतीने कैदेत टाकण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)