चीन व भारताला मिळणाऱ्या कथित अनुदानाला ट्रम्प यांचा तीव्र विरोध

आगामी आठवड्यात निर्देशांकांवर परिणाम होण्याची शक्‍यता

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह इतर काही देशांबरोबर सुरू केलेले व्यापारयुद्ध आगामी आठवड्यात चिघळण्याची शक्‍यता आहे. या घडामोडीचा शेअरबाजार आणि चलनबाजारावरही परिणाम होण्याची शक्‍यता विश्‍लेषकांना वाटते.

ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना अमेरिकेने चीनवर लावलेल्या 200 अब्ज डॉलरच्या आयात शुल्काचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, माझी इच्छा नसतानाही अमेरिकेला व्यापारात न्याय मिळावा म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी आठवड्यात चीनच्या वस्तूंवर आणखी 267 अब्ज डॉलरचे आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता ट्रम्प यांनी वर्तवली.

ते म्हणाले की, भारत आणि चीन स्वत:ला विकसित देश समजून घेतात. त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनाही भारत आणि चीनचा हा दावा मान्य करून त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारात सवलती देते. जागतिक व्यापार संघटनेने हा अयोग्य व्यापार थांबविला नाही तर अमेरिका जागतिक व्यापार संघटनेतूनच बाहेर पडेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. ते असेही म्हणाले की, अमेरिकाही चीन आणि भारतासारखाच विकसनशील देश आहे. त्यामुळे आम्हालाही आमचा व्यापार सुरक्षित करण्याचा अधिकार आहे.

ट्रम्प यांच्या युक्‍तिवादाचा परिणाम शुक्रवारी जागतिक शेअरबाजारावर पडला आणि ट्रम्प यांनी जे सांगितले ते खरोखरच पुढील आठवड्यात केले तर त्याचा परिणाम पुढील आठवड्यातही भारतासह इतर देशांच्या शेअरबाजारावर पडू शकतो. याच कारणामुळे बळकट होत असलेला डॉलर आणखी बळकट होऊन रुपया कमकुवत होऊ शकतो. याचा भारताला जागतिक व्यापारात आणखी त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर शेअरबाजारात 10 टक्‍क्‍यांपर्यंत करेक्‍शन होऊ शकतो, अशी चर्चा दबक्‍या आवाजात शेअरबाजारात केली जाऊ लागली आहे.

अमेरिकेने या अगोदर तुर्कस्तानविरोधात मोठे नकारात्मक व्यापारी निर्णय घेतल्यानंतर जागतिक चलनबाजारात मोठी उलथापालथ झालेली आहे. त्याचे चलनबाजारावर पडसाद अजूनीं चालू आहेत. जर पुन्हा ट्रम्प यांनी चीनविरोधात मोठी कारवाई केली तर चीनही त्या प्रमाणात बदल्याची कारवाई करण्याची शक्‍यता आहे. तसे झाले तर त्याचा जागतिक व्यापारावर आणि चलनबाजारावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आगामी काळात गुंतवणूकदार आणि सल्लागार सावध राहण्याची शक्‍यता आहे.

ट्रम्प यांनी या कामासाठी युरोपियन समुदायातील देश आणि जपानचे सहकार्य मागितले आहे. त्याचबरोबर जर या बाबी जागतिक व्यापार संघटनेने नियमाप्रमाणे केल्या तर अमेरीकेला असे करण्याची गरजच पडली नसती. त्यामुळे ट्रम्प यानी संघटनेला सुधारणा करण्यास सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)