चीन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक 

मुंबई -चीनमधील सिचुआन प्रांतातील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पसंती दर्शविली आहे. ही आनंदाची बाब असून राज्यात गुंतवणूक करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्‍वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.चीनच्या शिष्टमंडळाने उद्योगमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या शिष्टमंडळात सिचुआन प्रांताचे उपाध्यक्ष पेन युसिंग, उपसचिव ज्यु जियाद, सिचुआन सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी विभागाचे महासंचालक लियो डोंग आदींचा सहभाग होता. या बैठकीला उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, एम.आय.डी. सीचे श्री. पाटील, सीआयआय या औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी निनाद करपे, इंडो चायना फेडरेशनचे राजीव पोद्दार उपस्थित होते.

याप्रसंगी देसाई म्हणाले, देशात परकीय गुंतवणुकीत राज्य अग्रेसर आहे. राज्यात वीज, पाणी, जमीन आणि कुशल मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारत आहे. दहा मेट्रो लाईन आणि राज्यभर असलेले महामार्गांचे जाळे यामुळे राज्यात उद्योग करणे अधिक सुकर झाले आहे. चीनने राज्याला गुंतवणुकीसाठी पसंती दिली त्याबद्दल मी त्यांचे स्वागतच करतो. सिचुआन हे चीनमधील सर्वात मोठा प्रांत असून एकूण देशाच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे 40 टक्के वाटा सिचुआनचा आहे.

इलेक्‍ट्रॉनिक, उद्योग, पर्यावरण, वाहतूक, पायाभूत सुविधा, रस्ते, महामार्ग बांधकाम, पर्यटन, कला, ऊर्जा, टेलिकॉम, अन्न व कृषी उद्योग आदी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे सिचुआन प्रांताचे उपाध्यक्ष पेन युसिंग यांनी सांगितले. राज्यात गुंतवणूक करण्यास सध्या पोषक वातावरण आहे. उद्योग सुरू करण्यासाठी परवानग्यांची संख्याही कमी केलेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम कमी झाली आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदार राज्याला पसंती देत आहेत. चीनने भारतात औद्योगिक देवाण घेवाण सुरु केली असून भारतात केवळ आयात-निर्यात न करता गुंतवणूक करून उत्पादन करण्याचा मानस या शिष्टमंडळाने बोलून दाखविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)