चीन मध्येही महात्मा गांधींना आदरांजली 

बिजींग: चीनच्या राजधानीतील चाओयांग पार्क मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्माजींच्या वचनांचे फलक तेथे जागोजागी लावण्यात आले होते तसेच त्यांच्या भजनांचा कार्यक्रमही तेथे आयोजित करण्यात आला होता. विविध घटकातील नागरीक तेथे उपस्थित होते.
चीन मधील भारतीय दूतावासातील सांस्कृतीक पथकाने यावेळी येथे भजन गायनाचा कार्यक्रम केला. या पार्क मध्ये महात्माजींचा पुतळा सन 2005 मध्ये बसवण्यात आला आहे. त्या पुतळ्याला अनेकांनी पुष्पांजली अर्पण केली. गांधी जयंती निमीत्त आम्ही स्थानिक चीनी नागरीकांच्या मदतीने यावर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे अशी माहिती भारतीय दूतावासातील प्रमुख ऍक्वीनो विमल यांनी सांगितले. चीनी विचारवंतांचे गांधींच्या तत्वज्ञानाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्नही यानिमीत्ताने केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)