चीन मधील इंडस्ट्रीयल पार्क मध्ये स्फोट ; 19 ठार

बिजींग – चीन मधील इंडस्ट्रीयल पार्क मध्ये झालेल्या स्फोटात 19 जण ठार झाले असून अन्य 12 जण जखमी झाले आहेत. चीनच्या दक्षिण पश्‍चिमेकडील यिबिल हेंगडा टेक्‍नॉलॉजि नावाच्या केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. ही फॅक्‍टरी सिचुआन प्रांतात आहे. काल या स्फोटामुळे फॅक्‍टरीच्या परिसरात जी आग लागली होती ती आग आज सकाळी विझवण्यात आली.

फॅक्‍टरीतील केमिकलची हाताळणी बेफिकीरीतून झाल्याने ही घडल्याचे सांगण्यात येते.चीन मध्ये औद्योगिक सुरक्षा नियम फारसे गांभीर्याने पाळले जात नाहींत त्यामुळे तेथे होणाऱ्या अशा प्रकारच्या दुर्घटनांचे मोठे आव्हान तेथे निर्माण झाले आहे. तथापी विविध प्रांतातील स्थानिक प्रशासनाने अजून हा विषय फारशा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. तेथे अशा औद्योगिक दुर्घटना ही आता नित्याचीच बाब बनून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)