चीन-पाकिस्तान नवीन रेल्वे-सडक मालवाहतूक सेवा सुरू 

बीजिंग (चीन): चीन आणि पाकिस्तान दरम्यान नवीन रेल्वे आणि सडकमार्गे मालवाहतूक सेवा सुरू झालेली आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली. चीनच्या उत्तर-पश्‍चिम प्रांत गान्सूची राजधानी लांझोऊ पासून ते पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत ही मालवाहतूक सेवा चालणार आहे. लांझोऊपासून शिनजियांग प्रांतातील काशगरपर्यंत ट्रेनने आणि तेथून पुढे इस्लामाबादपर्यंत सडक मार्गाने मालवाहतूक करण्यात येणार आहे.

या मार्गावरील पहिली मालगाडी मंगळवारी सकाळी लांझोऊपासून काशगरसाठी रवाना झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय बंदर व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लियू जेह यांनी दिली. यातून मशीनरी, उपकरणे आणि वाहनांचे सुटे भाग रवाना करण्यात आले आहेत. लांझोऊ ते इस्लामाबाद हे 4.500 किमी अंतर पार करण्यास 13 दिवस लागणार आहेत. याच प्रवासासाठी सागरी मार्गाने 15 दिवस लागतात. लांझोऊपासून दक्षिण एशियाकडे जाणारी ही दुसरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. सन 2016 मध्ये लांझोऊ ते काठमांडू रेल्वे वाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)