चीन-पाकचा भारतविरोधी दुराग्रह कायम 

एनएसजी सदस्यत्वाच्या अर्जाला विरोध करण्यासाठी हालचाली 

बीजिंग – शेजारी देश असणाऱ्या चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिका कायम आहेत. आण्विक पुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताचा समावेश होऊ नये यासाठी चीनच्या हालचाली सुरूच आहेत. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) स्थायी सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांची पाकिस्तानने खिल्ली उडवली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्व असलेल्या 48 सदस्यीय एनएसजीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. अमेरिका आणि रशिया यासारखे प्रमुख देश भारताला प्रवेश देण्यासाठी अनुकूल आहेत. त्यासाठी ते अण्वस्त्र प्रसारसंबंधी भारताचे रेकॉर्ड अतिशय चांगले असल्याचे सातत्याने नमूद करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याउलट, चीनने भूमिका घेतली आहे. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केली नसल्याच्या बाबीवर चीन बोट ठेवत आहे. त्या करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशांना प्रवेश देण्याची प्रथा नसल्याचा दुराग्रह चीनने कायम ठेवला आहे. भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज केल्यानंतर पाकिस्ताननेही तसेच पाऊल उचलले आहे. अर्थात, इतर प्रमुख देशांचा पाकिस्तानवर विश्‍वास नाही.

दरम्यान, यूएनएससीशी संबंधित सुधारणा प्रक्रियेचा आग्रह भारताने धरला आहे. ती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नव्या मार्गांचा अवलंब केला जावा, अशी मागणी नुकतीच भारताने केली. मात्र, यूएनएससीमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू असल्याने पाकिस्तान अस्वस्थ आहे. त्यातून भारताने केलेल्या मागणीनंतर पाकिस्तानने टीका केली. काही देशांच्या आकांक्षांमुळे ती सुधारणा प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप करत पाकिस्तानने भारतावर निशाणा साधला. अर्थात, तो आरोप करताना पाकिस्तानने भारताचा नामोल्लेख टाळला. मात्र, भारताच्या प्रयत्नांमुळे पाकिस्तानला होत असलेली पोटदुखी उघड झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)