चीन निवडणुक कार्यात ढवळाढवळ करत असल्याचा अमेरिकेचा आरोप

वॉशिंग्टन (अमेरिका): चीन अमेरिकेच्या निवडणूक कार्यक्रमात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमात हेराफेरी करण्याबरोबरच जनमत प्रभावित करण्याचा प्रचंड प्रयत्न चीनने केला असल्याचे आणि चीनच्या “लॉबिंग’ समोर इतर देशांचे “लॉबिंग’ फिके पडत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे, या संदर्भात चीनला कडक ताकिद देण्यासाठी आणि अमेरिकन नागरिकंना चीनच्या कुटिल हेतूची कल्पना देण्यासाठी अमेरिकेने उपाध्यक्ष माईक पेन यांना पुढे केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले, की चीनच्या या दुष्ट कारवायांबाबतची ही माहिती गुप्त आहे. गुरुवारी उपाध्यक्ष माईक पेन यांनी चीनसंबधी केलेल्या भाषणानंतर जॉन बोल्टन यांनी हे वक्तव्य केले आहे.

-Ads-

चीनने थिंक टॅंकच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांवर आणि विद्वानांना धमकावून त्यांच्या राजकीय मतांवर प्रभाव टाकण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला असल्याची माहिती जॉन बोल्टन यांनी दिली. अमेरिकेच्या राजकारणात ढवळाढवळ करण्याच्या चीनच्या प्रयत्नांपुढे इतर देशांचे प्रयत्न फिके पडतात असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)