चीन आणि भारताची तुलना करणे अयोग्य

रघुराम राजन यांचे मत
न्युयॉर्क – भारत आणि चीन यांच्या आर्थिक स्थितीची चिंता करणे अयोग्य आहे. कम्युनिस्ट चीन हा भारतापेक्षा पाच पट अधिक मोठा आहे त्यामुळे ही तुलना अयोग्य ठरते असे प्रतिपादन भारताच्या रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. ही तुलना भारतावर अन्याय करणारी आहे. हे दोन्ही देश पुर्णत: वेगळे असून त्यांच्यात आर्थिक विकासाच्या बाबतीत अशी तुलना करता येऊ शकत नाही असे ते म्हणाले.

हॉर्वर्ड केनडी स्कुल मध्ये दिलेल्या व्याख्यानात त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की निकषांच्या आधारे तुलना केली तर भारताची ग्रोथ स्टोरी ही चीन पेक्षा अधिक आकर्षक आहे. भारताने गेली पंचवीस वर्षे सरासरीच्या सात टक्के दराने जीडीपी विकास केला. भारताच्या तुलनेत चीने पायाभूत सुविधा उभारणीत आणि मॅन्युफॅक्‍चरिंग सेक्‍टर मध्ये मोठे काम केले आहे तितके काम उभारणे भारताला शक्‍य झाले नाही. भारतात पायाभूत सुविधा उभारणे ही जिकीरीची बाब आहे असे नमूद करून ते म्हणाले की एखाद्या मार्गावर सहा पदरी महामार्ग उभारायचा तर भारतात हा मार्ग अनेकांच्या खासगी जमीनवरून जात असल्याने तेथे ही उभारणी करणे सहज शक्‍य नसते.

चीन मध्ये ही समस्या नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचीत केले. चीन मध्ये, कम्युनिस्ट पद्धतीची राजवट आहे. तेथे लोकभावना किंवा लोकांचा विरोध ही दुय्यम बाब असते. असेच बहुधा त्यांना सुचवायचे आहे. भारतीय लोकशाही हा भारतातील लोकांची सर्वात मोठी मिळकत आहे असेही राजन यांनी यावेळी नमूद केले. भारत लोकशाही मार्गाने विकास साधत असून येत्या दहा वर्षात भारत या बाबतीत चांगली प्रगती दाखवू शकेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)