चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्ध आणखी भडकले

एकमेकांच्या वस्तूंवर 16 अब्ज डॉलरचे आयातशुल्क लादले
बीजिंग – चीनी उत्पादन असलेल्या 16 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर अमेरिकेने आयात शुल्क लावल्याला प्रत्युत्तर म्हणून आज चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या 16 अब्ज डॉलरच्या वस्तूंवर 25 टक्के आयात शुल्क लागू केले. त्यामुळे या दोन्ही देशांमधील व्यापारी युद्ध अधिकच भडकणार हे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या तंत्रज्ञानाची चीनने चोरी केल्याचा आरोप करून अमेरिकेने 16 अब्ज डॉलरच्या चिनी वस्तूंवर आयात शुल्क लावले होते.

एकमेकांच्या दबावतंत्रावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र तरिही दोन्ही देशांनी पुन्हा एकदा आयात शुल्क लादले आहे. आर्थिक कारणाने निर्माण झालेला हा तणाव निवळण्यासाठी चीनचे वाणिज्य उपमंत्री वॅंग शौवेन यांनी अमेरिकेचे अर्थमंत्री डेव्हिड मालपास यांच्याशी चर्चा केली आहे. पण अजूनही “जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याचे तंत्र दोन्ही देशांनी कायम ठेवले आहे.

-Ads-

चीनने 100 अब्ज डॉलरची व्यापारी तूट ताबडतोब कमी करावी. तसेच स्वामीत्व हक्कांना अनुसरून अमेरिकेतील तंत्रज्ञान वापरलेल्या 200 अब्ज डॉलरच्या वस्तूंचा वापर वाढवावा, असे ट्रम्प यांनी सुचवले आहे. आयात शुल्काला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या चलनावर ताण आणला जात आहे, असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिका आणि चीनमध्ये 636 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार आहे. त्यामध्ये चीनचा वाटा 375 अब्ज डॉलरचा आहे. अमेरिकेच्या धोरणाप्रमाणेच चीनकडूनही ताठर भूमिका अवलंबली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांविरोधात जागतिक व्यापारी संघटनेकडे तक्रार करण्याची तयारी चीनने केली आहे. लादलेले आयातशुल्क हे “डब्लूटीओ’च्या नियमांचा भंग करणारे आहे, असे चीनने म्हटले आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांनी एकमेकांच्या उत्पादनांवर 25 टक्के आयात शुल्क लादले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
10 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
3 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)