चीनी अत्याचारांविरोधात तिबेटी युवकाचे आत्मदहन 

बीजिंग (चीन): चीनी अत्याचारांविरोधात एका तिबेटी युवकाने आत्मदहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिहुआन प्रांतात रविवारी सकाळी ड्रोब नावाच्या युवकाने आत्मदहन केले. आयसीटी (इंटरनॅशनल कॅंपेन फॉर तिबेट) या अमेरिकेतील संस्थेने ही माहिती दिली आहे. शिहुआन हा भाग पारंपरिकतेने तिबेटचा समजला जातो.

चिनी सरकारने तिबेटी लोकांवर लावलेले कडक निर्बंध आणि बौद्ध संस्कृतीवर चालवलेले जुलूम याकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी महिला-पुरुष भिक्षू आणि अन्य लोक आत्मदहनाचा मार्ग स्वीकारत असतात. दलाई लामांना पुन्हा तिबेटमध्ये आणावे अशीही त्यांची मागणी आहे.

-Ads-

गेल्या दशकभरात आपल्या मागण्याठी आणि चीनचा विरोध करण्यासाठी आत्मदहन करणाऱ्या तिबेटींची संख्या 154 झाली आहे. आत्मदहनाच्या अशा घटना रोखण्यासाठी चिनी अधिकाऱ्यांनी या भागात कडक सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख ठेवलेली आहे.

स्वत:ला जाळून घेण्यापूर्वी या युवकाने दलाई लामांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना केली. दलाई लामा 1959 पासून भारतात निर्वासिताचे जीवन जगत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)