उन्हाळ्याच्या दिवसांत उकाड्याचा त्रास होत नाही तेवढा रात्रीच्या वेळी कानापाशी येऊन गुणगुणणाऱ्या आणि इंजेक्‍शनच्या वेदनांप्रमाणे वेदना देऊन चावणाऱ्या डासांचा होतो. डास हा कीटक माणसासाठी उपद्रवी आहे यात शंका नाहीच. एखाद्या युद्धात जाणार नाहीत इतके जीव हा कीटक जगभरात एका महिन्यात घेतो. हा छोटा दिसणारा कीटक किती मोठ्या आकाराचा असेल याची कल्पनाही आपण करू शकणार नाही.

चीनच्या सिचुआन भागात कीटक वैज्ञानिकानी मोठ्या आकाराचा डास शोधला असून त्याच्या पंखांची लांबी सुमारे 12 सेंटीमीटर आहे. पश्‍चिम चीनच्या कीटक संग्रहालयाचे क्‍युरेटर चाओ ली याविषयी माहिती देताना म्हणाले, हलोससिया मिकाडो या प्रजातीचा हा डास असून तो सर्वप्रथम जपान मध्ये सापडला होता. त्याच्या पंखांची लांबी होती 8 सेंटीमीटर. चीनमध्ये त्यापेक्षाही मोठा डास सापडला आहे.

वाचकहो, डासाचे आकारमान पाहून वैतागला किंवा चिंतेत पडला असाल तर थांबा. कारण हा डास दिसायला भयानक असला तरी तो माणसाचे रक्त पीत नाही. त्याचा आहार आहे फुलातील परागकण. या डासांचे आयुष्य काही दिवसांचे असते. डासांच्या जगात हजारो प्रजाती आहेत. या पैकी 100 प्रजाती माणसासाठी धोकादायक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)