चीनमध्ये मुस्लिमबहुल क्षेत्रात टेहळणीसाठी हायटेक ड्रोन्स तैनात

बीजिंग (चीन) – मुस्लिमबहुल क्षेत्रात टेहळणीसाठी चीनने हायटेक ड्रोन्स तैनात केली आहेत. एखाद्या पक्ष्यासारखे दिसणारे हे ड्रोन्स त्यात बसवलेल्या कॅमेऱ्यांनी घेतलेले फोटो संबंधित नियंत्रकाकडे पाठवणार आहेत. मुस्लिमबहुल शिनजियांग प्रांतात पक्ष्यांसारखे दिसणारे ड्रोन्स तैनात केल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. चीनच्या पश्‍चिम भागातील शिनजियांग प्रांताच्या सीमा भारत, पाकिस्तान, मंगोलिया, रशिया, कजाखस्तान, तजाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमांना लागून आहेत.

शिनजियांगमधील मूळ निवासी उडगर मुस्लिमांचा तेथे स्थायिक होणाऱ्या हान समुदायातील चिनी नागरिकांना कडाडून विरोध आहे. काही विघटनवादी उडगर शिनजियांगला चीनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याने तेथील अस्थिरता वाढत आहे. या भागात काही दहशतवादी हल्लेही झालेले आहेत. हे क्षेत्र विघटनवाद्यांचा अड्डा असल्याने चीन सरकारची त्यावर बारीक नजर आहे. या भागात ड्रोन्स तैनात करण्याचे हेच मोठे कारण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)