चीनमध्ये बॉलिवूडचे अधिकाधिक चित्रपट दाखवले जावेत – शी जिनपिंग

चीनमध्ये बॉलिवूडचे अधिकाधिक चित्रपट दाखवले जावेत अशी इच्छा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यात दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात आध्यात्मिकता, व्यापार, तंत्रज्ञान, परंपरांबरोबरच मनोरंजन आणि चित्रपट क्षेत्रातील सहयोग वाढवण्यावरही चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे.

शी जिनपिंग यांना चित्रपटांची आवड आहे आणि भारतीय चित्रपट त्यांना विशेष आवडतात. असे सांगून विजय गोखले यांनी पुढे म्हटले आहे, की शी जिनपिंग यांनी हिंदीच नाही, तर अनेक क्षेत्रीय भाषांतील भारतीय चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळेच चीनमध्ये अधिकाधिक हिंदी चित्रपट दाखवले जावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)