चीनमध्ये बालवाडीतील मुलांवर चाकूहल्ला ;14 मुले जखमी 

बीजिंग (चीन): चीनमध्ये बालवाडीतील मुलांवर झालेल्या चाकू हल्ल्यात 14 मुले जखमी झाली आहेत. शिंशिजी किंडर गार्डनमध्ये शुक्रवारी हा प्रकार घडल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. लि यू (39) नावाच्या महिलेने हा मुलांवर हा चाकूहल्ला केल्याचे सांगण्यात आले आहे. मुले मैदानात खेळत असताना चीनमध्ये अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, आणि बहुतेक हल्लेखोर मनोरुग्ण असल्याचे दिसून आले आहे.

मुलांवर चाकूहल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली असली, तरी मात्र मुलांवर चाकूहल्ला का झाला याबाबतही काहीही महिती देण्यात आलेली नाही. आणि चाकूहल्ला केलेल्या 14 मुलांच्या प्रकृतीबाबत काहीही माहिती दिलेली नाही. या हल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात असले, तरी पोलीसांनी या गोष्टीचे खंडन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)