चीनमध्ये बसला आग लागून 26 पर्यटकांचा मृत्यू 

संग्रहित छायाचित्र.......

बीजिंग – चीनमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीत 26 पर्यटकांचा होरपळून मृत्यू झाला. त्या दुर्घटनेत 28 जणांना भाजले. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. हुनान प्रांतात शुक्रवारी सायंकाळी दोन चालक, एक टूर गाईड यांच्यासह 56 जणांना घेऊन जाणाऱ्या बसने महामार्गावर अचानक पेट घेतला.

काही क्षणांतच संपूर्ण बसला आगीने घेरले. वेगाने आग पसरल्याने पर्यटकांना सुटका करून घेण्याची संधीच मिळाली नाही. दुर्घटनेतून दोन्ही चालक बचावले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चीनमध्ये लागोपाठ दोन दिवसांत दोन भीषण दुर्घटना घडल्या. गुरूवारी त्या देशात एका रसायनांच्या कारखान्यात शक्तिशाली स्फोट झाला. त्यामध्ये 64 जण मृत्युमुखी पडले, तर 640 जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)