चीनमध्ये निर्माण झाला बर्फाचा धबधबा…

बीजिंग: चीनमध्ये एका इमारतीवर चक्क बर्फाचा धबधबा तयार झाला असून सध्या हा धबधबा सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. पिपल्स डेलिने याविषयी माहिती दिली आहे. चीनच्या अन्शान विभागात हा प्रकार घडला आहे. एका इमारतीचे पाईप लिकेज झाले होते. त्यामुळे त्या इमारतीवरून हे पाणी खाली गळत होते. पण त्या विभागात थंडीचे वातावरण असल्याने ते पाणी तिथंच गोठलं आणि चक्क फ्रोजन वॉटरफॉल तयार झाला.  हा फ्रोजन वॉटरफॉल  तब्बल १० मीटर उंच असल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. खरं तर ऑक्टोबर महिन्यापासून या इमारतीला गळती लागली होती. मात्र तेव्हा कोणीच याकडे लक्ष दिले नाही. मात्र जेव्हा इथे फ्रोजन वॉटरफॉल तयार झाला तेव्हा मात्र सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)