चीनमध्ये ड्रायव्हर-महिलेच्या भांडणात 13 प्रवाशांचा मृत्यू

बीजिंग (चीन): चीनमध्ये बसमधील एक महिला प्रवासी आणि बसचा ड्रायव्हर यांच्या भांडणात 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. रविवारी चॉंगक्विंग शहरात ही दुर्घटना घडली. यांगत्से नदीवरील पुलावरून बस जात असताना बसमधील एके महिला प्रवासी आणि बसचा ड्रायव्हर यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात त्या महिला प्रवाशाने ड्रायव्हच्या अंगावर हात टाकला. महिलेने मारल्यामुळे संतप्त ड्रायवहरने बस चालवत असतानाच तिला उलट मारण्याच प्रयत्न केला, त्या गडबडीत त्याचा बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून 50 मीटर्स खोल नदीत पडली. या अपघातात 13 प्रवासी मारले अणि 3 जण बेपत्ता असल्याची माहिती पोलीसंनी दिली आहे.

बसमधील वाचलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधील ली यू नावाच्या प्रवासी महिलेला एका विशिष्ट स्टॉपवर उतरायचे होते, पण ड्रायव्हरने तिला पुढच्या स्टॉपवर उतरण्यास सांगितले. त्यावरून दोघात वाद सुरू झाला. बस्‌ पुलावर असताना ली यूने ड्रायव्हरला मारहाण केली. ड्रायव्हर तिला उलट मारण्याच्या प्रयत्नात असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 50 मीटर खोल नदीत पडली. या दुर्घटनेत 13 लोक मरण पावले असून 2 जण बेपत्ता असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)