बिजींग – चीनमधील हुनान प्रांतात अत्यंत गजबजलेल्या चौकामध्ये एक एसयुव्ही कार गर्दीत घुसवल्याने तब्बल 11 जण ठार झाले. तर 44 जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आहेत. हे सगळेजण रस्त्यावरच रात्रीच्या भोजनानंतर नृत्याचा आनंद घेत होते. या भरधाव कारच्या चालकाने मुद्दामच गर्दीमध्ये कार घुसवली होती. त्याने नंतर कार थांबल्यानंतर बाहेर पडून हातातील सुऱ्याने नागरिकांवर सपासप वारही केले होते. बुधवारी रात्री हेन्ग्दोंग भागात ही घटना घडली.

वॅन्ग झन्युन असे या 54 वर्षीय चालकाचे नाव आहे. स्थानिक पोलिसांनी वॅन्गला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरूओ आहे. वॅन्गबाबत अन्य कोणतीही माहिती पोलिसांनी दिली नाही. वॅन्गला यापूर्वी दरोडेखोरी आणि ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अनेकवेळा शिक्षा झाली आहे, असे सरकारी वृत्तमाध्यमाने म्हटले आहे.

याशिवाय वॅन्गला पोटाचा कर्करोग आणि हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांचाही आजार जडला आहे. त्याने गेल्या 20 वर्षांपासून ड्रग्जचा व्यापार, आगी लावणे, धंदेवाईकपणे गैरव्यवहार आणि चोरीचे उद्योग केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)