चीनमध्ये उईघुर मुस्लिमांना दाढी वाढविण्यास महिलांना बुरख्यास बंदी

बीजिंग (चीन) – चीनमधील उईघुर मुस्लिमांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. चीनमधील शिनजियांग प्रांत हा उईघुर मुस्लीमबहुल प्रांत आहे. चीनमध्ये सुमारे 1 कोटी उईघुर मुस्लिम लोकसंख्या आहे.
फुटीरवादी मुस्लिमांकडून चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका असल्याचे चीनमध्ये मानले जाते. युवा उईघुर मुस्लिम वर्ग मूलतत्त्ववादाकडे सहजतेने आकर्षित होऊ शकेल अशा आशंकेने चीनमध्ये उईधुर मुस्लिमांवर अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. म्हाताऱ्या उईघुर मुस्लिमांचा अपवाद वगळता इतरांना दाढी वाढवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. महिलांनाही बुरखा वापरण्यावर बंदी आहे. मुलांना मशिदीमध्ये नेता येत नाही.
या दबाव तंत्रामुळे दहशतवादाला खतपाणी मिळेल असे अनेक टीकाकारांना वाटत असले, तरी दहशतवादाविरुद्ध जोरदार सर्वंकश मोहीम चीनने सुरू केली असून दहशतवादाविरुद्धचे हे युद्ध जिंकणारच असा चीनचा दावा आहे, आणि तोपर्यंत प्रत्येक उईघुर हा संशयित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)